फोन बंद, घर बंद… IAS पूजा खेडकर यांचं कुटुंब फरार ? पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू

390 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय फरार झालेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून खेडकर कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊन शकलेला नाही, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. खेडकर कुटुंबीयांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. खेडकर कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवायचे आहे मात्र कुटुंबातील कोणाशीच पोलिसांचा संपर्क होत नाहीये. विविध प्रकरणांची चौकशी आणि तपास करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांना पोलीस संपर्क करत आहेत. मात्र खेडकर कुटुंब सध्या नेमके कुठे आहे याची माहिती मिळत नाहीये.

दरम्यान दोन दिवसांपासून या सर्वांचे मोबाईल देखील स्विच ऑफ लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने खेडकर यांच्या घरी जाऊन बंगल्याचा चित्रीकरण देखील केले. काल देखील पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते, मात्र कालही कुटुंबातील कोणीही घरात नव्हते त्याचबरोबर बंगल्या बाहेरचे गेट ही बंद असल्यामुळे आत जाऊन तपास करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्यामुळेच खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून तीन पथकेही तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते.‌

Share This News

Related Post

#PUNE : मुळशी तालुक्यातील 28 वर्षीय कुस्तीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - March 8, 2023 0
पुणे : मुळशी तालुक्यातील स्वप्निल पाडाळे या अवघ्या 28 वर्षीय कुस्तीपटूचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. आज सकाळी व्यायाम करत…
Dead Body

Utter Pradesh : मृत्यूनंतरही यातना! रुग्णवाहिका नसल्याने भावावर बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून नेण्याची आली वेळ

Posted by - November 9, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) औरैया येथील बिधुना येथील सरकारी रुग्णालयातून (Government Hospital) एक धक्कादायक प्रकरण समोर आले…
Pravin Tarde

Pravin Tarde : यंदाचा ‘फकिरा पुरस्कार’ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवीण तरडे यांना प्रदान

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…
Pune News

Pune News : सुनील माने यांच्या ‘प्रभावांचा प्रवास’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Posted by - May 5, 2024 0
पुणे : व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. व्यक्तीवादामुळे भविष्यात देशांची (Pune News) हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असे परखड…

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे उद्घाटन

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *