Congress

‘त्या’ सात गद्दार आमदारांची नावं समोर ?; काँग्रेस हायकमांड दाखवणार पक्षातून बाहेरचा रस्ता

880 0

नुकताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले. त्यामुळेच महाविकास आघाडी मधल्या काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे उघड झाले आहे. या सातही आमदारांचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील हाय कमांड कडे पाठवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्याचबरोबर आमदार कोण आहेत याचा अंदाज आम्हाला होता, त्यानुसार आम्ही ट्रॅप लावला होता. हे गद्दार आमदार आमच्या ट्रॅप मध्ये अडकले आहेत. अशा विश्वास घातकी गद्दार लोकांना काँग्रेस मधून बाहेर काढले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता. मात्र हे सात आमदार नेमके कोण याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येत आहेत. आणि आता अखेर हे सात आमदार कोण असतील याची शक्यता समोर आली आहे.

फुटलेल्या आमदारांपैकी विदर्भातील 1, मराठवाडातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 आमदार तर एक मुंबईतील 1 आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व आमदारांवर संपूर्ण महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आग पाखड केली जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याची शिफारसही करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हे आमदार नेमके कोण आहेत, त्यांची नावे सध्या समोर आली आहेत.

हिरामण खोसकर, शिरीष चौधरी, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे हे सात आमदार फुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅप मध्ये अडकलेले सात आमदार हेच असल्याची सूत्रांची माहिती आहे. जर खरंच याच सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असेल, आणि तसे जर पक्षांतर्गत चाचणीत समोर आले, तर मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Share This News

Related Post

गद्दारांना आता धडा शिकवणारच! विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगनंतर नाना पटोले ॲक्शनमोडवर

Posted by - July 13, 2024 0
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
Vasant More

Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY

Posted by - March 29, 2024 0
पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय… वसंत मोरे यांनी कायमच भाजपला…

National Herald case : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का ? काँग्रेस आंदोलनावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची आज ईडीमार्फत…
Eknath Shinde

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

Posted by - February 11, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसेला मोठा धक्का दिला…
Nanded Crime News

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 3, 2024 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *