विशाळगड अतिक्रमण प्रकरण पेटलं, ‘अतिक्रमण खपवून घेऊ शकत नाही’; संभाजीराजे छत्रपती आक्रमक

382 0

विशाळगडावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे ही मागणी अनेक दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आज हजारो कार्यकर्त्यांसह संभाजी राजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. विशाळगड संकटात असताना मी तिथे जाणारच अशी प्रतिक्रिया देत संभाजी राजे हे विशाळगडाकडे रवाना झालेत. या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल झाले तरी चालेल, त्याचा मला अभिमान असेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले संभाजी राजे छत्रपती ?

संभाजीराजे छत्रपती हे शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. तिथे पोहोचणे आधी ते बांबावडे या ठिकाणी थांबले होते. तेव्हा शिवभक्तांनी त्यांच्या हातात हातोडा देत विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याचे मागणी संभाजीराजेंकडे केली. विशाळगडला जाण्याआधी बांबवडे इथं थांबले होते. यावर सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अगदी शिताफीने या वेढ्यातून निष्डून विशाळगडावर पोहोचले होते. त्यावेळी पावनखिंडीत झालेली ऐतिहासिक लढाई लक्षात ठेवून पावनखिंड संग्राम दिन म्हणून 13 जुलै हा दिवस साजरा केला जातो. पण याच संग्राम दिनाच्या दिवशीही विशाळगड आज संकटात आहे. त्यामुळे विशाळगडावरचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिला आहे.

Share This News

Related Post

स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन

Posted by - June 11, 2023 0
स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून या संमेलनात देशभरातील तब्बल 4500 आमदारांचा सहभाग राहणार असल्याची…

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर…
Jitendra Awhad

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)…

‘मी कोणाला घाबरत नाही..’ म्हणत पूजा खेडकरच्या आईची पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकी

Posted by - July 12, 2024 0
‘मी कोणाला घाबरत नाही..’ म्हणत पूजा खेडकरच्या आईची पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *