न्युज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य; कशी आहे अमित गोरखेंची राजकीय पार्श्वभूमी?

986 0

 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं आणि त्याची निकालही जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाच्या पाचही आमदाराने विजय मिळवला. पहिल्याच निवडणुकीत थेट अमित गोरखे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी वर्णी लागली. पाहुयात अमित गोरखे नेमके कोण आहेत?

विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक पार पडली आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे ,परिणय फुके ,योगेश टिळेकर , सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे सर्वच पाच आमदारांनी 26 मत घेत विजय मिळवला तर अजित पवार गटाचे शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर तर शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले.

तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांना पाठिंबा दिला होता. परंतु त्यांना केवळ बारामती मिळाली आणि त्यांचा विधान परिषद निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या 11 आमदारांपैकी भारतीय जनता पक्षाच्या अमित गोरखे यांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व म्हणून अमित गोरखे यांच्याकडे पाहिलं जातं.

अमित गोरखे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे.पिंपरी-चिंचवड क्षेत्रात नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम आहे.अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना मिळाला असून त्यांचा, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची त्यांची नाळ आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्षही राहिले आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारनंतर 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचं काम त्यांनी केलं. भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. अमित गोरखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. एकंदरीत अमित गोरखे यांचा प्रवास हा न्युज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य असा आहे.

Share This News

Related Post

Megha Dhade

‘बिग बॉस मराठी फेम’ मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; ‘या’ राजकीय पक्षात केला प्रवेश

Posted by - June 15, 2023 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) ही आपल्या बोल्ड लुक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. तिने आजवर अनेक…
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

Posted by - February 7, 2024 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) अनेकवेळा सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत…
Ahmednagar News

Ahmednagar News : 32 वर्ष निवडणूक लढला पण प्रत्येकवेळी पडला तरी जिद्द नाही हरला अखेर 51 व्या वर्षी सरपंच बनला

Posted by - November 8, 2023 0
अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या…
Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरु आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *