पुणे शहराला पुन्हा “ऑरेंज अलर्ट”; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

181 0

पुणे शहरातील घाटमाथ्यांवर आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा नैऋत्य मौसमी वारे सक्रिय होणार असल्यामुळे शुक्रवारपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे वीकेंड्सला बाहेर फिरण्यासाठी, ट्रेकिंग साठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला.

पुण्यासह सातारा, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, कोल्हापूर, पालघर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

ऑरेंज अलर्ट- पुणे, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी

येलो अलर्ट- मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग

विजांच्या गडगडाटासह पाऊस- गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया, वर्धा, नागपूर

Share This News

Related Post

IAS पूजा खेडकरच्या वडिलांना दिलासा! दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर 

Posted by - July 19, 2024 0
IAS पूजा खेडकरच्या वडिलांना दिलासा! दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे आई-…
ST

Pune ST Bus : पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

Posted by - October 30, 2023 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी आंदोलनामुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम…

आयुष्मान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 23, 2022 0
पुणे : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर दर्जेदार…
Devendra Fadanvis And Sharad Pawar

Devendra Fadanvis: शरद पवारांनी ‘त्या’ शपथविधी आधीच भूमिका बदलली; फडणवीसांची टीका

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला…

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू

Posted by - June 8, 2024 0
दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *