VIDEO: गोव्यातील बनावट दारूची महाराष्ट्रात तस्करी, सव्वा कोटींचा मद्य साठा जप्त; खेड शिवापुरमध्ये पकडला ट्रक

537 0

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या सासवड विभागाने अवैध दारू साठा जप्त केला असून याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोव्यातील बनावटी मद्याची तस्करी पुण्यातून होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती, त्यात अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

ही दारू गोवा बनावटीची असून याची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी आहे. हा सर्व मुद्देमाल घेऊन जालन्याच्या दिशेने एक ट्रक निघाला असल्याची गोपनीय माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याच अनुषंगाने राज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेक पोस्ट वर सर्व वाहनांची तपासणी सुरू केली. या दरम्यान वाहन क्र. एचआर ६३ डी ८८७८ हा ट्रक खेडशिवापूर टोल नाक्यावर अडवण्यात आला. चालकाला ट्रक मध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्याने संशयास्पद उत्तर दिली. त्यामुळे या ट्रकची तपासणी केली असता हा मद्य साठा आढळून आला. गोवा राज्यात बनवल्या जाणाऱ्या आणि विक्री होणाऱ्या रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९.६८० सिलबंद बाटल्या (१६६० बॉक्स), रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सिलबंद बाटल्या (५४० बॉक्स) आढळून आल्या. हा सर्व मद्य साठा, एक ट्रक आणि एक मोबाईल फोन असा १,५१,०६,६००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालक सुनिल चक्रवर्ती याला अटक करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९०, व १०८ अन्वये सासवड विभागाने गु. र. क्र. १५७/२०२४ दि. १०/०७/२०२४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Share This News

Related Post

“मै मानता ही नही हु कि मै राज्यपाल हु…!” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

Posted by - December 10, 2022 0
पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे…
Sharad Pawar Shirur

Maharashtra Politics : आम्ही शरद पवरांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 5 आमदारांनी जाहीर केली आपली भूमिका

Posted by - July 2, 2023 0
पालघर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी…
Chitra Wagh

Chitra Wagh : राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता… चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Posted by - September 3, 2023 0
पुणे : सध्या राज्यात जालना येथील मराठ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra…

घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

Posted by - March 8, 2023 0
पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,…
FIR

एनडीएतील उच्च पदस्थ अधिकार्‍याला डांबून ठेवत केली मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून एनडीएतील उच्चपदस्थ अधिकार्‍याला निवृत्त न्यायाधीश पत्नी, निवृत्त कर्नल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *