अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

982 0

देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटामध्ये मोठी खलबतं सुरू आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीला मिळू शकतो या विचाराने अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हे शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे पुणे शहरात असलेली शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार असून अजित पवार गटाला मात्र कार्यकर्ते पदाधिकारी टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यादरम्यान पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी आहे, पिंपरी चिंचवड मधील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली पक्षप्रवेशा बाबत चर्चा केली असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे. मात्र याच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी अजित पवार गटचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भातील काही चर्चा झाल्या आहेत. दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन येत्या पाच जुलैला हे सगळे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे.

पक्षप्रवेशावर काय म्हणाले शरद पवार?

दरम्यान या सगळ्या घटनेवर बोलताना शरद पवार यांनी मला रोजच विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे भेटायला येत आहेत. त्यामुळे जे पक्षात येत असतील त्यांचं स्वागतच आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी देखील घर वापसीचे सकारात्मक संकेत दिले आहेत.‌

Share This News

Related Post

पुणे : अग्निशमन दलाचे नियंञण कक्ष विमा कंपनीच्या रेकॉर्डिंगने व्यस्त…

Posted by - October 6, 2022 0
पुणे : अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष हे आग वा आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे कार्य पार पाडत असते. दलाच्या…

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

Posted by - February 2, 2022 0
बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य…
sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील…

धक्कादायक:”कुणाकडे तक्रार करायची तर कर,मी कुणाला घाबरत नाही”,अशी धमकी देऊन पिटी शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Posted by - July 10, 2022 0
पुणे : “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही….”अशी धमकी देऊन शाळेतील पिटी शिक्षकानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक…

पुणे महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रवादीचं घंटानाद आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित होणं, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याच विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *