पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! 5 लाखांपर्यंत आरोग्य सेवा मिळणार मोफत… कसे ? वाचा सविस्तर

4252 0

पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे.‌ या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशात आत्तापर्यंत केशरी आणि पिवळा रंगाचे रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या दोन्ही योजना रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.‌ त्यामुळेच या योजनेमध्ये पांढरे रेशन कार्ड धारकांचा समावेश व्हावा यासाठी सरकारने फेरविचार केला आणि आता ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही लागू होईल या संदर्भातला शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे.‌ पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा ५ लाखांपर्यत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे. यासाठी पांढरे रेशन कार्ड आधारकार्डला जोडण्याची मोहीम राबवावी, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी रेशन कार्डधारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशनकार्ड आणि आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

CHANDRAKANT PATIL : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १ जानेवारीपासून तर घोड कालव्याचे १० जानेवारीपासून; कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न

Posted by - December 15, 2022 0
पुणे : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली.…

“पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 28, 2022 0
नाशिक : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय (PFI) या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी पीएफआयवर…
Manoj Jarange

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Posted by - February 10, 2024 0
मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका…

ठाकरे कुटुंबियांचे आणखी सहा घोटाळे समोर येणार; किरीट सोमय्यांचा इशारा

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई करून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. ईडीने मुख्यमंत्री…
Hingoli News

Hingoli News : दोघां भावांच्या मृत्यूने हिंगोली हळहळलं ! जिवंतपणी हातात हात घालून फिरले; मरतानादेखील एकमेकांची साथ नाही सोडली

Posted by - October 22, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा या ठिकाणी 5…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *