आत्महत्या की घातपात ? पाण्याच्या टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पुण्यातील हांडेवाडी परिसरात खळबळ

4163 0

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत नाही. पाण्याच्या टँकर मधून पाणी येत नसल्याने टँकरचे झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये घडली. याच भागात राहणाऱ्या कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) या महिलेचा हा मृतदेह आहे. ही महिला घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा थेट मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर विविध भागांमध्ये पाणी पोहोचवल्यानंतर संध्याकाळी ससाणे यांनी टँकर आपल्या घराजवळ पार्क केला होता. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. गुरुवारी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर पाणी भरण्यासाठी बाहेर काढला. रामटेकडी येथे त्यात पाणी भरले व टँकर घेऊन ते फुरसूंगी परिसरातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका ठिकाणी पाणी पोचवण्याकरिता गेले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर पाण्याच्या टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे पाण्याच्या पाईप मध्ये काही बिघाड झाला असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी सुरुवातील पाण्याचा पाईप तपासला त्यात काहीच आढळून आले नाही म्हणून वॉल्व्ह तपासला. सगळे काही दुरुस्त असूनही पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिले असता साडीचे कापड आढळून आले. साडी टँकर मध्ये कशी आली हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचे झाकण उघडले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. थोड्याच वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, या महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने हांडेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही महिला नेमकी घरातून का निघून गेली होती ? तिने स्वतः या टँकरमध्ये आत्महत्या केली की खून करून हा मृतदेह टँकरमध्ये टाकण्यात आला, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

#CM EKNATH SHINDE : प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण ; म्हणाले …

Posted by - September 12, 2022 0
आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होते आहे. परंतु ही सभा एका व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे अधिकच चर्चेत आली…
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : ‘बालिश चाळे सोडा अन् आहे तो पक्ष तरी..’ ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला

Posted by - February 19, 2024 0
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी ठाणे दौरा केला. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचे…

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022 0
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं…

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Posted by - March 15, 2022 0
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *