आता टोइंग चार्ज ची चिंता नाही; नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांनी दिल्या नव्या सूचना

3396 0

पुण्यात पार्किंगचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेक वेळा पार्किंग ची सोय नसल्यामुळे नो पार्किंग मध्ये वाहन चालकांकडून वाहने लावली जातात. ही वाहने टोइंग केली जातात. ज्याचा अतिरिक्त दंड भरावा लागतो. यासाठीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबत त्यांनी ‘टोइंग’ करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी परिपत्रक जारी केले आहे.

नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन वापरली जाते. हे काम खाजगी कंपन्यांना देण्यात आलेले आहे. अनेक वेळा गाड्या ओढून नेणारे हे कर्मचारी वाहन चालकांशी वाद घालतात. गाडीचा मालक गाडीच्या जवळ असला तरीही अनेकदा गाड्या ओढून नेल्या जातात. अशा तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळेच टोइंग करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस आयुक्तांनी बैठक घेतली.

 

या बैठकीत वाहने नो पार्किंग मध्ये पार्क केलेली असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असल्यास वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये गाडी टोइंग करण्याचा दंड ही आकारला जातो. त्यामुळेच गाडी टोइंग करताना जर गाडीचा मालक त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर टोइंग चार्ज घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यात पार्किंगची समस्या गंभीर आहे. अनेक जण इतर शहरातून पुण्यात आलेले असतात. पार्किंग बद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते. अनेकदा सम विषम तारखेला कुठे पार्किंग असते, याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहने ओढून नेण्याच्या आधी कर्मचाऱ्यांकडून ध्वनीक्षेपकाद्वारे घोषणा केली जावी, त्यानंतर अशा प्रकारची कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

Share This News

Related Post

निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात ठाकरे गटाची दिल्ली हायकोर्टात धाव; याचिकेवर होणार उद्या सुनावणी; ‘ही’ आहे ठाकरे गटाची मागणी

Posted by - October 10, 2022 0
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अर्थात धनुष्यबाण हे गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला…

पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

Posted by - January 26, 2022 0
पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर…
Rajiv Mishra Death

Rajiv Mishra Death: क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ ! हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - June 24, 2023 0
भारताचे माजी ज्युनियर हॉकीपटू राजीव कुमार मिश्रा वाराणसीच्या सरसौली भागात राहत्या घरी गूढ परिस्थितीत मृतावस्थेत (Rajiv Mishra Death) आढळून आले.…
Supriya-Sule

#PUNE : पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खासदार सुप्रिया सुळे

Posted by - March 9, 2023 0
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…
Kirit Somayya

चर्चा किरीट सोमय्यांच्या अश्लील व्हिडिओची ! भाजप आणि विरोधक आमने सामने

Posted by - July 18, 2023 0
पुणे : भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *