Uddhav And Sanjay Raut

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

962 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र विशेष न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड ठोठावला आहे. तसेच ही रक्कम दहा दिवसांच्या आत राहुल शेवाळे यांना देण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला आहे. त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड ठोठावला. विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोघांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र विशेष न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा दिला आहे. त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य करण्यात आला आहे. मात्र त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Kuldeep Konde

Kuldeep Konde : कुलदीप कोंडे यांनी दिला शिवसेना पक्षपदाचा राजीनामा

Posted by - October 30, 2023 0
नसरापूर : मराठा समाज आरक्षण व सर्वसामान्य समाजाप्रती आदर राखत असल्याचे पवित्रा घेत उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा…
Pritam Munde

Pritam Munde : ‘मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय’ प्रीतम मुंडेंचं वक्तव्य

Posted by - October 20, 2023 0
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमादरम्यान मला राजकारणातील तुरटी व्हायचंय, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पंकजा…
Ramdas Kadam

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Posted by - March 15, 2024 0
मुंबई : महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीचा दौरा करणार असून लवकरच महायुतीच्या सर्व जागांचं…

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा, ‘या’ दिवशी निवडणून, वाचा सविस्तर

Posted by - November 3, 2022 0
गुजरात : 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे 25 वर्ष…

“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *