Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांनी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला

549 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनीही आज पदभार स्विकारला. यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी, तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 100 दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.

पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारमधले हे महत्त्वाचे खाते आहे. या क्षेत्रात आव्हानं खूप असली तरी गेल्या दहा वर्षात या विभागात खूप मोठे काम झाले आहे. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. मला आठवते आहे, पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो. मात्र, त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण समोरच्या खुर्चीवर कधीकाळी बसू. भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे.

‘पुढच्या 10 वर्षातं सगळे बदललेले असेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरु करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करुन गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.’

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Weather Update : पुढचे 4 तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Politics : विधानसभेच्या 2 आमदारांचा राजीनामा

Nagpur Blast : नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत भीषण स्फोट; 5 जण ठार

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Manoj Jarange : मनोज जरांगेचे उपोषण स्थगित; 13 जुलैपर्यंत सरकारला दिला अल्टीमेटम

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Ramdas kadam and Bhaskar Jadhav

Ramdas Kadam : भास्कर जाधवांना शिंदे गटात का घेतलं नाही? रामदास कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Posted by - March 10, 2024 0
मुंबई : दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला होता तेव्हा भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार…
Ajit Pawar And Amol Kolhe

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Posted by - March 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापही महाविकासआघाडी आणि महायुतीच्या जागांबाबतचा…
Indapur Accident

Indapur Accident : इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात; 1 शिक्षक ठार

Posted by - December 21, 2023 0
इंदापूर : पुण्यातील इंदापूरमधून (Indapur Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात झाला…
Sunil Mane

Constitution Day : शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करावा सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Posted by - October 28, 2023 0
पुणे :  यावर्षीचा संविधान दिवस (Constitution Day) Preamble-‘प्रास्ताविका’चे महत्व सांगण्याची थीम घेऊन राज्यात साजरा करावा अशी मागणी मी मुख्यमंत्री तथा…
Pune News

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 1, 2024 0
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण (Pune News) पाहायला मिळत आहे. मात्र या उत्सवाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *