Chhatrapati Sambhajiraje

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

191 0

पुणे : स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्‍यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे (Pune News) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तरपणे भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे
1) वाढीव दराने खते व बियाणे विकणार्‍या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.
2) काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाई देखील केली जाते अशी माहिती देखील आम्हाला मिळाली.
3) या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹266/- रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ₹800/- रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबत चे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे.
4) ही घटना अतिशय धक्कादायक आहे. MRP पेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे.
5) सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीये हे अतिशय धक्कादायक बाब आहे.
6) राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

आता बास…! जशाचं तसं उत्तर देऊ, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणारा नाही ! – संदीप खर्डेकर

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून समता…

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…
Narendra Modi Sabha

Narendra Modi : पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घातली खास पगडी

Posted by - April 29, 2024 0
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या…
Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Sharad Pawar : अजितदादांचे गौप्यस्फोट खरे की खोटे? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 2, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या या…

पुणे दर्शनमध्ये फुले वाड्याचा समावेश करा, आम आदमी पक्षाची मागणी

Posted by - May 14, 2022 0
पुणे- पुणे दर्शनमधून महात्मा फुले वाडा वगळण्याच्या पीएमपीएलच्या कृतीचा आम आदमी पक्षाने तीव्र विरोध केला आहे. पुणे दर्शन बस मार्गामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *