Satara News

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

736 0

सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक घटना (Satara News) समोर आली आहे. जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला वाचवलं असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
साताऱ्यातील पाटखळ गावात धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात जुन्या वादातून संशयित शिवजीत माने या युवकाने त्याच्या इतर साथीदारांना घेऊन अनिल शिंदे या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती पस्तीस टक्केहुन अधिक भाजून जखमी झाली आहे. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ जखमी व्यक्तीच्या अंगावरील आग विझवून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणातील संशयित शिवजीत माने यांच्यासह 3 जणांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे.…
Maharashtra Rain

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार सर्वाधिक पाऊस

Posted by - May 13, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर (Maharashtra Weather) वाढल्यामुळे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरु आहे. मुंबई, नवी…
Mumbai Assembly

Maharashtra Politics : विधानसभेच्या 2 आमदारांचा राजीनामा

Posted by - June 13, 2024 0
मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार निवडून आले. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48…

राज्य सरकारने हरी नरकेवर गुन्हा दाखल करावा; अंजुम इनामदार, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - October 15, 2022 0
पुणे : डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो…

PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगाराला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक ; मोठ्या घातपाताचा अनर्थ टळला

Posted by - August 1, 2022 0
PUNE CRIME NEWS : पुणे विमानतळ पोलीस पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. राहुल गवळी या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *