Pune News

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

784 0

पुणे : भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्गद्वारे जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे आयोजित केला जातो.

दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला सुलतान या लघुपटाची युरोप खंडातील जर्मनी मधील स्टुटगार्ट या शहरात पार पडत असलेल्या या 21 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल स्टुथगार्ट 2024 साठी अधिकृत निवड झाली असून सुलतान लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात जूलै महिण्यात पार पडणार आहे. स्पर्धेतील कित्येक लघुपटाला मागे टाकून सुलतानची या महोत्सवासाठी निवड झाली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सुलतान या लघुकथेवरून प्रेरीत असलेल्या सुलतान लघुपटाचे संपुर्ण शुटिंग बीड जिल्ह्यातील बीड , माजलगाव, पात्रूड , श्रृंगारवाडी -(तालखेड ) या ठिकाणी झाले आहे , ब्लॅक हॅार्स मोशन ह्या चित्रपट निर्माती संस्थेने या लघुपटाची निर्मीती केली असून सहनिर्माता विजय क्षीरसागर आहेत.

या लघुपटात सुलतानच्या प्रमुख भूमिकेत ख्वाडा फेम अभिनेते अनिल नगरकर आहेत तर अभिनेते गणेश देशमुख, अनिल कांबळे,श्रीकांत गायकवाड,संतोष वडगिर,अजय साठे,तानाजी साठे यांच्या भूमिका आहेत.या लघुपटाचे सांऊड डिझानिंग राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रसिेद्ध सांऊड डिझायनर अविनाश सोनवणे यांनी केले आहे.कलादिग्दर्शन अतूल लोखंडे तर छायाचित्रण अभिजीत घुले यांनी केले आहे तसेच पार्श्वसंगीत डॅा जयभीम शिंदे यांनी दिले आहे. तर व्हीएफ एक्स (VFX ) एस एम रोलिंगचे पंकज सोनावणे यांनी केले आहे.

दिग्दर्शनाच्या पर्दापणात सुलतानची आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी समाधान व्यक्त केले असून सुलतानच्या संपुर्ण टीमवर सर्वत्र कौतूक आणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…
neelam-gorhe

Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या वाटेवर?

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून…

पुणेकरांनो ! पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी पुण्यात दाखल; काळजी घ्या; प्रशासन सतर्क

Posted by - December 28, 2022 0
पुणे : चीनने गेल्या तीन वर्षापासून जगभर कोरोनामुळे भीतीच वातावरण पसरवलं आहे. कोरोना आणि आज पर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *