Upendra Dwivedi

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

2036 0

मुंबई : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून ते 30 जून रोजी पदभार स्वीकारणार आहेत. केंद्र सरकारकडून याची घोषणा करण्यात आली आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या लष्कराचे उप-प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर जनरल मनोज पांडे 30 जून रोजी निवृत्त होतील, त्यावेळेस उपेंद्र द्विवेदी नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.

नवे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याबाबत थोडक्यात माहिती
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या उपसेनाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
19 फेब्रुवारी रोजी त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी 2022-2024 पर्यंत उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
पूर्व लडाखसंदर्भात चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लष्कराच्या उत्तर कमांडचे काम चीनला लागून असलेल्या सीमेचे आणि पाकिस्तानजवळील भारताच्या सीमेचे रक्षण करणे हे आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी झाला आहे. त्यांनी रेवा येथील सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे.
15 डिसेंबर 1984 रोजी ते भारतीय लष्कराच्या 18-जम्मू काश्मीर रायफल्समध्ये भरती झाले होते.
यानंतर त्यांनी युनिटची कमान सांभाळली. सुमारे 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

#MNS : रवींद्र खेडेकर यांच्यासह सहा जणांची मनसेतून हकालपट्टी; कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याने कारवाई

Posted by - February 22, 2023 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते साईनाथ बाबर यांनी दिलेल्या पत्रकानुसार रवींद्र खेडेकर, सागर पांगारे ,गोपी घोरपडे, अनिल बांदांगे ,रिजवान…

घरात बाळाचा जन्म झाला आहे, पण सारखच रडतंय ? तर घरातला ‘हा’ कोपरा बारकाईने तपासा

Posted by - February 23, 2023 0
घरामध्ये बाळाचा जन्म होण हे संपूर्ण घरासाठी एक नवचैतन्य निर्माण करत असतं. खरंतर जन्म आणि मृत्यू हे जीवनाचा सत्य आहे…

समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूचं !

Posted by - March 4, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक केमिकलने भरलेला होता. त्यामुळे ट्रक खाली…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *