Noor Malabika Death

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

793 0

मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री नूर मालाबिका दासने (Noor Malabika Death) आत्महत्या केली आहे. ‘द ट्रायल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना 6 जून रोजी लोखंडवाला स्थित असलेल्या फ्लॅटमध्ये ती मृताअवस्थेत सापडली. तिने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. 37 वर्षांच्या अभिनेत्रीच्या आत्महत्येनं इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

शेजाऱ्यांना अभिनेत्रीच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अभिनेत्री तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह सडला होता. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट NGOनं अभिनेत्रीवर रविवारी अंत्यसंस्कार केले.

नूर मालाबिका कोण आहे?
नूर मालाबिका ही आसामची राहणारी आहे. त्याशिवाय तिनं हिंदी चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यात ‘सिसकियां’, ‘, ‘वॉकमैन’, ‘तीखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्याशिवाय तिनं डिज्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रायल’ मध्ये दिसली होती. त्या सीरिजमध्ये ती काजोल आणि जीशु सेनगुप्तासोहत दिसली होती. नूर मालाबिका ही आसामच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते होते. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नूर मालाबिकाचे 163K फॉलोवर्स आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

Akshaya Deodhar and hardik joshi

Akshaya Deodhar : मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये पाठक बाईंनी लाडक्या राणादा साठी घेतला ‘हा’ खास उखाणा

Posted by - August 31, 2023 0
अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणजेच आपल्या लाडक्या पाठकबाई आणि अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच आपला लाडका राणादा या दोघांनी गेल्या…

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

Posted by - May 25, 2022 0
पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या…
NIA

NIA : ISIS मॉड्युल प्रकरणात NIA मोठी कामगिरी; आरोपी शमील साकिब नाचनला अटक

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आणखी एका…

जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन

Posted by - November 19, 2022 0
जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मुलगा होशांग गोविल…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! लेकाची हत्या करून बापाची आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - August 15, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील शिवणी येथे पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना 27 जुलै रोजी घडली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *