Narendra Modi

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

824 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांनासुद्धा शपथ दिली गेली. दरम्यान, आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाआधीच मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून खासदार गोपी सुरेश यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत सुरेश गोपी?
सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे एकमेव खासदार आहेत.सीपीआईचे उमेदवार वी.एस. सुनीलकुमार यांचा सुरेश गोपी यांनी 74 हजार 686 मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. एक्शन हिरो असलेल्या गोपी यांनी भाजपच्या तिकिटावर त्रिशूरमध्ये मोठा विजय मिळवत केरळमध्ये भाजपसाठी इतिहास घडवला होता.

केरळमध्ये भाजप दशकांपासून खातं उघडण्यासाठी संघर्ष करत आहे. शेवटी सुरेश गोपी यांच्यामुळे भाजपचं केरळमध्ये खातं उघडलं. केरळमध्ये भाजपचे एकमेव खासदार असलेल्या सुरेश गोपी त्यांचे अर्धवट चित्रपट पूर्ण करायचे आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं म्हटलंय. रविवारीच त्यांनी केंद्रीय राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली होती. लोकसभेत विजय मिळवण्याआधी 2016 मध्ये ते राज्यसभा खासदार होते. 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…

महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - March 8, 2022 0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा…

दिल्लीतील ट्वीन टॉवर आज होणार जमीनदोस्त; काय आहे कारण

Posted by - August 28, 2022 0
नवी दिल्ली:  नोएडा येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज रविवारी (ता.28 ऑगस्ट) रोजी दुपारी अडीच वाजता पाडण्यात येणार आहेत.…

T20 World Cup : शोएब अख्तर म्हणे,”पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅकपॅक होईल…!” पहा VIDEO

Posted by - October 28, 2022 0
पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने…
Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपची ऑफर ते पवारांच्या भेटीगाठी; राज ठाकरेंनी सांगितलं लोकसभेचं प्लॅनिंग

Posted by - August 14, 2023 0
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *