Weather Update

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

273 0

मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुण्यात धडकला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून, नैऋत्य मोसमी वारे वेगानं पुढे सरकताना दिसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्रातील पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड हे जिल्हे व्यापले असून पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र आणि मुंबई व्यापेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या गुरुवारी मान्सूनचं महाराष्ट्रात आगमण झालं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत धडकल्यानंतर आता मान्सून मराठवाड्यातील काही भागांमध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून पुढील 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोल्हापुरातील घाट भाग आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Chandrapur News

Chandrapur News : कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला मात्र अचानक गंभीर आजारानं ग्रासलं, अन् संपूर्ण चंद्रपूर हळहळलं

Posted by - August 25, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Chandrapur News) एका तरुणाने व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या…

पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा; नितेश राणे यांचं अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान

Posted by - May 13, 2022 0
औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचा दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय…
Ratnagiri News

Ratnagiri News : ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात 26 वर्षीय इंटिरिअर डेकोरेटरचा दुर्दैवी अंत

Posted by - October 19, 2023 0
रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील…

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा ; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 19, 2022 0
मुंबई : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री…
Nanded Crime News

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 3, 2024 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *