Murlidhar mohol

पुण्याला मिळणार मंत्रिपदाची संधी; मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन

354 0

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ संपन्न होत असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्यासह 50 ते 55 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन केला गेला असल्याची माहिती आता मिळत असून मुरलीधर मोहोळ यांच्या रूपान पुण्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

या अगोदर यूपीए सरकारमध्ये सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार असताना त्यांनी रेल्वे आणि क्रीडा खात्याचा कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं होतं त्यानंतर प्रकाश जावडेकर हे देखील राज्यसभेवर असताना केंद्रीय माहिती प्रसारण खात्याचा मंत्रीपद जावडेकरांनी भूषवलं होतं. कलमाडी आणि जावडेकरांनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने आता तिसऱ्यांदा पुण्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक

Posted by - March 18, 2022 0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले…
EVM

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Posted by - February 8, 2024 0
सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी (EVM Theft) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठी…

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महिला दिनाच्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.…
Ayush Prasad Accident

Ayush Prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

Posted by - July 6, 2023 0
पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात (Ayush Prasad…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *