Raj Thackeray

भाजपाला मोठा दिलासा; कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार

299 0

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं.

कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपा कडून निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून अभिजीत पानसे यांच्या उमेदवारीमुळे भाजपाला फटका बसेल असं बोललं जात होतं.

कारण कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेला मानणारा पदवीधर वर्ग मोठा आहे. जर या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला असता तर भाजपाच्या मतांवर त्याचा निश्चित परिणाम झाला असता. त्यामुळे भाजपाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. देवेंद्र फडणवीसांनी सूत्रे हाती घेतली आणि राज ठाकरेंना विनंती केली. त्यांच्या या विनंतीचा मनसेनेही विचार करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.

दरम्यान एकीकडे राज्यातील राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला कोणत्याही अटी शर्थींविना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघात उमेदवारही दिला होता. त्याचबरोबर ही उमेदवारी मनसेची महायुती म्हणून असेल तर भाजपच्या येथील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, असे काही घडले नाही.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीच्या छापा ! मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच…
Ajit Pawar And Sharad Pawar

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) मोठी फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 160 कोटींचे ड्रग्ज जप्त; 2 जणांना अटक

Posted by - October 30, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका आठवड्यात दुसऱ्यांदा अंमली पदार्थांविरोधात मोठी…

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी संभाजी ब्रिगेडची रणनीती ; मराठा सेवा संघात मोठे बदल

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप आणि शिंदे सरकार स्थापन झाले . आता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *