Murder

Pune News : पुणे हादरलं ! प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

415 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक (Pune News) बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकराने प्रेयसीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. मोनिका कैलास खंडारे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे तर आकाश अरुण खंडारे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे. दोघे नातेवाईक असून, त्याचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघे ही गावाहून पुण्यात पळून आले होते. पुण्यात स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. 13 मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आणि हि घटना उघडकीस आली.

कुटुंबीयांचा विरोध नडला
मोनिका आणि आकाश हे दोघे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांचा या प्रेमाला विरोध होता. त्यांनी कुटुंबियांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचा प्रेमाला विरोध होता. याच रागातून मृत आकाशने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News

Related Post

Jalgaon

आईला चहाच्या टपरीवर सोडून तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने…

Rain Update : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Posted by - July 15, 2022 0
पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी…

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले; मागण्या मान्य

Posted by - November 10, 2022 0
पुणे : MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला…

#ELECTIONS : कसब्यात मतदात्यांचा अल्प प्रतिसाद ; कसबा आणि चिंचवडच्या मतदानाची आतापर्यंतची किती आहे टक्केवारी, वाचा सविस्तर

Posted by - February 26, 2023 0
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. दोन्ही प्रमुख पक्षांसाठी…
Narendra Modi Sabha

Narendra Modi : पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घातली खास पगडी

Posted by - April 29, 2024 0
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *