Rahul Tripathi

Pune News : ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठीची निवड; पुनीत बालन यांनी केली घोषणा

936 0

पुणे : टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधव याने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन राज्यातील तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला. त्यांच्या या निर्णयामुळे ‘कोल्हापूर टस्कर्स’चे मालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला.

राज्यात कालपासून (दि. २ जून) ‘एमपीएल’चा दुसरा हंगाम सुरु झाला असून सलामीच्या सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यात झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. ३ जून) केदार जाधव यांनी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षीच्या पहिल्या हंगामातही केदार जाधव यांनीच कोल्हापूर टस्कर्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. परंतु त्यांच्या निवृत्तीमुळे संघमालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधार म्हणून घोषणा केली. आता राहुल त्रिपाठी आणि उपकर्णधार श्रीकांत मुंडे ही जोडगोळी कोल्हापूर टस्कर्सला कोणत्या दिशेने घेऊन जातेय याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

केदार जाधव यांनी खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अलीकडच्या काळात त्यांनी मराठीमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे क्रिकेट समालोचक म्हणून त्यांची क्रिकेटच्या मैदानातील नाळ कायम राहते की नाही, हे येणाऱ्या काळात लवकरच दिसेल.

‘‘अत्यंत अनुभवी खेळाडू असलेले केदार जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी निवृत्ती घोषित करणं, हा माझ्यासाठीही एक धक्का आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेमलेले असल्याने त्यांच्या अनुभवाचा आम्हा सर्वांनाच मोठा फायदा होत होता. परंतु त्यांच्या निर्णयाने संघ मालक पुनीत बालन सर यांनी संघाचीच जबाबदारी माझ्यावर टाकली. संघातील सर्व खेळाडूंना सोबत घेऊन त्यांचा हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.’’
कोल्हापूर टस्क
राहुल त्रिपाठी
(कर्णधार, कोल्हापूर टस्कर्स)

‘कोल्हापूर टस्कर्स’ संघासाठी आजचा दिवस कठीण आणि वेगळा आहे. केदार जाधव यांची निवृत्ती ही आम्हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती. ते केवळ एक खेळाडूच नाही तर माझे चांगले मित्र आहेत. आज त्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी क्रिकेटच्या मैदानाशी आणि क्रिकेटशी त्यांचं नातं कायम राहील, असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पुनीत बालन
(युवा उद्योजक व संघमालक, कोल्हापूर टस्कर्स)

 

Share This News

Related Post

Narendra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन

Posted by - August 1, 2023 0
पुणे : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान…

मोदींच्या दौऱ्यात राष्ट्रवादी ताकदीनं विरोध करणार – प्रशांत जगताप

Posted by - March 3, 2022 0
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ‘पानिपत’ होणार आहे. याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र…

Veer Savarkar, Secret Files : ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

Posted by - October 19, 2023 0
पुणे :‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ (Veer Savarkar, Secret Files) या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ…
chandrakant patil

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Pune News

Pune News : सौ.उषाबाई पन्नालाल पितळीया यांचे संथारा व्रत पूर्णाहुती

Posted by - October 25, 2023 0
पुणे : आज दि.25 /10/2023 रोजी बिबवेवाडी येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष पन्नालाल पितळीया यांच्या धर्मपत्नी सौ.उषा पितळीया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *