Weather Update

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

1435 0

मुंबई : 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर आता हवामान विभागाकडून (Monsoon Update) मान्सूनबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. मान्सूननं आपला केरळमधील मुक्काम पुढे हलवला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग व्यापून पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, तापमानात घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार मान्सून पूर्व पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, सहा जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यंदा सरसरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, यंदा सरासरीच्या 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हंटल आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

मोठी बातमी! पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द

Posted by - August 10, 2022 0
पुणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा…

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Posted by - June 8, 2024 0
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी समुहाचे संस्थापक…

दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

Posted by - September 30, 2022 0
पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना…

नीरा उजवा तसेच डाव्या कालव्यातून 30 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Posted by - March 27, 2022 0
नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी…
Lalit Patil

Lalit Patil : ‘ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो’, ‘या’ आमदाराने केला थेट आरोप

Posted by - October 23, 2023 0
पुणे : ‘ललित पाटीलचा (Lalit Patil) कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर कोणताही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *