Nagar News

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

409 0

पारनेर : अहमदनगरमधील सुपा येथे थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपऱ्या काढण्यात आल्या. माजी आमदार निलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकातील संपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले.

सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर दि.25 मे रोजी बांधकाम विभाग, चेतक एंटरप्रायजेस यांच्या वतीने अतिक्रमणांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरू असताना काही अतिक्रमणधारकांनी आम्हाला दि.30 तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली. या विनंतीला मान देत अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती. 30 तारखेचा दिलेला शेवटचा अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा शनिवार दि.1 जून रोजी दुपारी 2 वाजता मोठा फौजफाटा बसस्थानक परिसरात दाखल झाला. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Related Post

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Posted by - March 6, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताचं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन…

ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार, काय आहे कारण ?

Posted by - May 28, 2022 0
मुंबई- भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला…

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ‘ते’ वक्तव्य भोवलं! मालेगावात गुन्हा दाखल

Posted by - January 4, 2024 0
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव (Malegaon) तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना…

गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

Posted by - October 30, 2022 0
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत…

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर

Posted by - April 7, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *