Rohit Virat

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

1102 0

मुंबई : येत्या 2 जूनपासून T-20 वर्ल्डकपला (T-20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. आजपर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सामने खेळले गेले आहेत, परंतु आजपर्यंत जगातील केवळ 11 खेळाडूंनी विश्वचषकात शतक झळकावले आहे. या 11 खेळाडूंमध्ये फक्त एकमेव भारतीय फलंदाज आहे. आता तुम्ही म्हणाल कि तो फलंदाज रोहित किंवा विराट असेल मात्र तो खेळाडू या दोघांपैकी कोणीच नाही आहे. तर त्या खेळाडूचे नाव आहे सुरेश रैना 14 वर्षांपूर्वी त्याने हा विक्रम केला होता.

टी-20 विश्वचषकात शतक झळकावणारा सुरेश रैना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 2010 च्या विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही खेळी खेळली होती. या सामन्यात रैनाने 59 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि त्याचा डाव 60 चेंडूत 101 धावांवर संपला. हा सामना 2 मे 2010 रोजी खेळवण्यात आला होता. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यानंतर पाच विश्वचषक स्पर्धा झाल्या, मात्र रैनाशिवाय एकाही भारतीय खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Related Post

Bhiwandi News

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Posted by - April 3, 2024 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत भिवंडीत चाकू हल्ला करण्यात…
Kaia Arua

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Posted by - April 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीची महिला क्रिकेटर काया अरुआ…
Team India

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

Posted by - September 19, 2023 0
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे…
Rinku Singh

Ashish Nehra’s Prediction : आशिष नेहराचा रिंकू सिंगबद्दलचा ‘तो’ अंदाज ठरला खरा

Posted by - December 1, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra’s Prediction) सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *