Dr Ajay Taware

Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?

310 0

पुणे : पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट (Dr Ajay Taware) पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात रोज आरोपींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कारचालक वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल्स बदलल्या प्रकरणी ससूनचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली. तर हे सॅम्पल बदलण्यासाठी स्वतः विशाल अग्रवालने तावरे यांना 14 फोन केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता अजय तावरे हे नाव प्रचंड चर्चेत आलंय. पण तावरेंचं नाव अशा प्रकरणांमध्ये आल्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा असे अनेक गंभीर प्रकरणात तावरे सहभागी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे कोण आहेत हे डॉ. अजय तावरे आणि कसा आहे त्यांचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जाणून घेऊया…

डॉ. अजय तावरे हे सध्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत.अपघात घडल्याचा दुसरा दिवशी अकरा वाजता कारचालक वेदांत अग्रवाल याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र वडील विशाल अग्रवाल यांनी स्वतः अजय तावरे यांच्याशी चौदा वेळा फोन वरून संपर्क करत रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले. तावरे त्या दिवशी सुट्टीवर असल्याने त्यांनी श्रीहरी हळनोर यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले. आणि त्यामुळेच त्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून आलं नाही. याच्या अगोदर डॉ. तावरे यांचा आणखी काही गंभीर प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास आढळून आलं आहे.

2022 मध्ये एक किडनी तस्करी करणारं रॅकेट समोर आलं होतं. यामध्ये कोल्हापूरच्या सारिका सुतार नावाची महिला पुण्यातला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची किडनी काढण्यात आली. तेव्हा तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीचे प्रमुख होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ससून मध्ये विषारी उंदीर चावल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देखील तावरे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. तावरे यांची २९ डिसेंबर २०२३ मध्ये ससूनच्या अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. मात्र पुन्हा १९ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा तावरे यांच्याकडून अधिक्षकपदाचा कारभार काढून घेण्यात आला. कारण ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणातही ललित पाटील ला ससून च्या बाहेर जाऊ देण्यात, त्याचबरोबर हॉटेलमध्ये राहू देण्यावर निर्बंध न घालण्यात अजय तावरे यांचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला गेला होता. तर याआधी 2018 मध्ये रेहाना शेख नावाच्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. शेख यांना प्रसूतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाला. आणि वेळेत त्यांना रक्त न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यावेळी देखील डॉ‌. तावरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. आणि अर्थात तावरेंनी डॉक्टरांच्या बाजूने निकाल दिला. रक्तपेढीत चौकशी केल्यानंतर तावरेंनी खोटा निकाल दिल्याचं उघड झालं असल्याचं शेख कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

अजय तावरे यांचं नाव अनेक मोठ्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलंय. पण एवढेच नव्हे तर तावरे यांच्याबद्दल ससून मधील अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांनीही तक्रारी बोलून दाखवलेल्या आहेत. त्यामुळेच अजय तावरे हे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडतात असा त्यांचा रेकॉर्ड आहे. वारंवार गंभीर प्रकरणांमध्ये डॉ. अजय तावरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग असल्यास आढळून आलं आहे. त्या त्या वेळी त्यांच्यावर लहान मोठ्या कारवाया देखील झाल्या. मात्र पुन्हा त्यांच्याकडे नवा पदभार का सोपवला जातो ? हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आरोपी असलेले डॉ. अजय तावरेंची शिफारस ही पोर्शे कार अपघात प्रकरणात संशयास्पद भूमिकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचं शिफारस पत्र सध्या समोर आलं आहे. डॉ. तावरे यांची ससूनच्या अधिक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेक गंभीर प्रकरणात नाव येऊन सुद्धा तावरेंवर कठोर कारवाई केली गेली नाही त्यामुळेच त्यांच्यावर नेमका कोणाचा वरद हस्त आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punit Balan : काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

Share This News

Related Post

पुणेकर थंडीने गारठले, राज्यात सर्वात कमी तापमान पुण्याचे, वाचा सविस्तर

Posted by - November 1, 2022 0
पुणे : दिवाळीनंतर पावसानं उसंत घेतली पण पुणेकरांची स्थिती सध्या आगीतून फुफाट्यात झाल्यासारखे आहे पावसानं यावर्षी पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर जोडपून…

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच ! गाडी हळू चालवायला सांगितल्यानं कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; गृहविभागाने तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी – रूपाली चाकणकर

Posted by - January 16, 2023 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे अगदी क्षुल्लक कारणांवरून कोयते हातात घेऊन दहशत…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे फेरनिवड

Posted by - April 20, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर थिगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…
Dasra

Kasba Ganapati : श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शाही दसऱ्याचे आयोजन

Posted by - October 25, 2023 0
पुणे : विजयादशमीच्या निम्मित श्री कसबा गणपती (Kasba Ganapati) चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक शस्त्रपूजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम…
Pune-PMC

Pune Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर

Posted by - September 2, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही गणेशोत्सवासाठीच्या (Pune Ganeshotsav 2023) नियोजनासाठी तयारी सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *