Ajit Pawar

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

487 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. निवडणुकीनंतर काही काळ हा वाद थोडा शांत झाला होता. मात्र आता अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाष्य केलं होतं. त्यावेळी जर छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
2004 बद्दल पवारांनी केलेलं वक्तव्य धादांत खोटं होतं. त्यावेळेला सीएमपदासाठी मी इच्छुक नव्हतो. मात्र, भुजबळांनी राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली होती. त्यामुळे भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही असा गौप्यस्फोट अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलाय. 2004 साली राष्ट्रवादीचा सीएम झाला असता तर पक्ष फुटला असता, असं विधान पवारांनी केलं होतं त्यावर अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?
अजित पवारांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार? याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. तेव्हा मुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रीपदाच्या काही जागा आणखी मिळत असतील तर घेऊ असं ठरलं, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

Chandrasekhar Bawankule

लातूरचा खासदार 51% मतांनी निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Posted by - December 5, 2023 0
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याची…

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; प्रकरण पोहोचले पोलीस स्टेशन पर्यंत, वाचा सविस्तर

Posted by - October 28, 2022 0
महाराष्ट्र : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी चलनी नोटांवर…
Pune Murder

भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या! पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं

Posted by - May 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे…

माळुंगा गावाला तातडीची मदत ; पुणे महापालिकेची तातडीची मदत

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅबोरेटरीचे उद्घाटन

Posted by - April 18, 2022 0
पुणे- दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग व युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *