MHT CET Result

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

318 0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज इयत्ती दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2024) जाहीर केला आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन विद्यार्थ्यांना निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहे. याअगोदर बोर्डाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाचे ठळक वैशिष्ट्यं सांगण्यात आली. दहावीसाठी एकूण 72 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 9 विभागीय मंडळातून 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार विद्यार्थ्या उत्तीर्ण झाले. 25 हजार 770 रिपीटर विद्यार्थी होते. त्यापैकी 12 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विभागनिहाय निकाल
कोकण विभागीय मंडळाची बाजी 99.01
सर्वात कमी निकाल नागपूर- 94.73 टक्के
विद्यार्थिनी- 97.21
विद्यार्थी निकाल- 94.56
72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे

कुठे पाहता येईल निकाल
तुम्ही ऑनलाईन निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरुन जाऊन तिथे माहिती अपडेट करायची आहे. विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.

३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.

४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे. ५

. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.

६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.

७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.

८. एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.

९. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१०. राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

Mahayuti

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त…
Saatbara

Online Heir : तलाठ्यांच्या ताण होणार कमी; आता ऑनलाईन करता येणार वारस नोंद

Posted by - August 17, 2023 0
मुंबई : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शेतकरी कुटुंबातील कर्त्या…
Amol Kolhe

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : शिरूरमधून अमोल कोल्हे ६,११६ मतांनी आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
शिरूर : शिरूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. शिरूर मधून अमोल कोल्हे…
Loksabha Election

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी (Loksabha Election) एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजपासून मतनदाला संपूर्ण देशात सुरुवात झाली…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Posted by - March 31, 2024 0
मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलं आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *