Raj Thackery

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

449 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आता या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर आता मनसेनी निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे.

विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित पानसे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत, त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी सेनेचं काम केलं आहे. आता त्यांना राज ठाकरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कधी होणार निवडणूक?
सुधारीत निवडणूक कार्यक्रामानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात होणार आहे, शेवटची तारीख 7 जून असणार आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होईल, बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तर 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

Rahul Narvekar

Disqualified MLA : आमदारांच्या अपात्रेसंदर्भात नार्वेकरांनी बोलावली तातडीची बैठक; काय घडणार नेमके?

Posted by - July 24, 2023 0
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (Disqualified MLA) मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी तातडीची बैठक…

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Posted by - December 13, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु…
Nagpur News

Nagpur News : 2 व्यापाऱ्यांचे अपहरण करून हत्या; नागपूर हादरलं…

Posted by - July 27, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली…
eknath shinde

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : मराठा समाजाचे (Maratha Reservation) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी…
Nagpur News

Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 17, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये नागपुरच्या बाजार गावातील सोलार एक्सप्लोझिव कंपनीमध्ये भीषण स्फोट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *