ई-बस नंतर आता ऑलेक्ट्रा घेऊन येणार भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक

126 0

सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या वाढत्या किंमती, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना  प्राधान्य दिले जात आहे. आता पुण्याच्या रस्त्यावर ऑलेक्ट्राच्या 150 इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.

पुण्यापूर्वी सुरत, मुंबई, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि डेहराडून येथे ऑलेक्ट्रा कंपनीच्या बसेस धावत आहेत. या इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील CO2 उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल. या बसेसनंतर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने शुक्रवारी इलेक्ट्रिक ट्रक विभागात विस्तार करण्याच्या त्यांच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, 6×4 हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकची यशस्वी चाचणी केली.

इलेक्ट्रिक बस उत्पादनातील अग्रणी ऑलेक्ट्राने आता ट्रक उत्पादनात प्रवेश केला आहे. एका चार्जवर 220 किमी अंतर कापणारे ऑलेक्ट्रा टिपर हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक आहे. हा ट्रक जड बोगी सस्पेन्शन ट्रिपरसोबत बनवलेला आहे, जो 25 टक्क्यांपेक्षा जास्त उंची किंवा उतार असलेल्या रस्त्यावर धावण्यास सक्षम आहे. हैदराबादच्या बाहेरील भागात अत्याधुनिक सुविधांसह या ट्रकचे उत्पादन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share This News

Related Post

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : बलात्कार पीडितेवर केल्या जाणाऱ्या ‘Two Finger Test’ वर बंदी

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण…

पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात

Posted by - July 5, 2022 0
पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून  तब्बल १ कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महानगर पालीकेच्या उपायुक्तासह…

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे महाप्रबोधन यात्रेला अल्पविराम; विरोधकांनी पुन्हा तयार रहा…!

Posted by - December 9, 2022 0
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.…

गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

Posted by - October 30, 2022 0
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत…

‘एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मी पैसे घेतले, पण…’ गुणरत्न सदावर्ते यांची न्यायालयात कबुली

Posted by - April 20, 2022 0
मुंबई- गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *