Pune News

पुणे अपघात प्रकरण : पबवर सरसकट कारवाई का? व्यावसायिक, वेटर्स, बाउन्सर्स, सप्लायर्सने घरं कशी चालवायची?; हॉटेल असोसिएशनने उपस्थित केले सवाल

371 0

पुणे : पुण्याच्या कल्याण नगर मध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर अनेक सरकारी यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. ज्या गोष्टी बेकायदेशीर असूनही अनेक दिवसांपासून सुरळीतपणे सुरू होत्या त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील पब्स आणि बारवर धडक कारवाई केली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसात 40 पेक्षा जास्त पब आणि बारचे परवाने रद्द करून त्यांना सील केले गेले आहे. यावर काही मोजक्या लोकांचा बेकायदेशीर कृत्यामुळे सरसकट कारवाई करणे योग्य नसल्याची भूमिका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

‘पुण्यात अडीच हजार पेक्षा जास्त पब, क्लब आणि बार आहेत. यातील बहुतांश पब हे कायदेशीर आणि परवानाधारक आहेत. काही ठराविक भागातील पब सोडल्यास इतर सर्व पब हे ठरलेल्या वेळेत म्हणजेच दीड वाजता बंद होतात. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंडवा, कोंढवा आणि बाणेर या भागातील काही ठराविक पब हे दीड नंतरही चालू असतात. त्यामुळे जे पब मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात त्यांच्यावर जरूर कारवाई करावी. त्याचप्रमाणे कोझी पब मध्ये अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल याला मद्य सर्व्ह करण्यात आले होते. मात्र असे सगळीकडेच होते असे नाही. सगळ्यात पब मध्ये 25 वर्षांखालील व्यक्तीस मद्य दिले जाणार नाही अशी नोटीस लावलेली असते. तरीही अनेक वेळा ग्राहकांकडून खोटे ओळखपत्र दाखवून आपले वय 25 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे भासवले जाते. ही खोटी ओळखपत्रे देखील अगदी खरी वाटावी इतकी हुबेहूब असतात. तर मद्य देण्यास नकार दिल्यास वाद घातले जातात. त्यामुळे नाईलाजास्तव अल्पवयीन मुलांना मद्य सर्व्ह करावे लागते. अगदी काही पब मध्ये जाणून बुजून अल्पवयीन मुलांना प्रवेश किंवा मद्य दिले जाते. अशा नियमबाह्य गोष्टी करणारे केवळ पाच ते सात टक्के पब, बार चालक आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून केवळ त्यांच्यावरच कारवाई करणे योग्य आहे. पण अपघाता प्रकरणात दोषी आढळलेल्या तीन पब मुळे सरसकट सगळ्यांवर कारवाई करणे हे योग्य नाही’, असे मत गणेश शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेने आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेल्या पब आणि बार पैकी आठ पब आणि बार हे हॉटेल असोसिएशनच्या अधिकृत सदस्यांचे आहेत. जवळपासच्या पब मध्ये निर्बंधांचे उल्लंघन केले जाते, म्हणून सरसकट कारवाईचे बळी पडले आहेत. जे मालक-चालक सर्व नियम पाळून, कायदेशीर रित्या योग्य प्रकारे व्यवसाय करतात त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही. त्याचबरोबर कोणतीही कारवाई करण्याच्या आधी प्रशासनाने नोटीस पाठवणे गरजेचे असते, मात्र विना नोटीस कारवाई करण्यात आल्याने हॉटेल असोसिएशन देखील या कारवाईच्या विरोधात उभी ठाकली आहे. सरसकट कारवाईमुळे जवळपास 5000 पेक्षा जास्त तरुणांचे रोजगार धोक्यात आले आहेत. ज्यामुळे 500 पेक्षा जास्त कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनी कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ? हॉटेल क्षेत्रातील पुरवठा धारकांची जी साखळी आहे. त्यातील इतरांनी आपले व्यवसाय कसे करायचे ? असे अनेक प्रश्न या कारवाईमुळे उभे राहिले आहेत. त्यामुळेच तपासात दोषी आढळलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी मात्र सरसकट कारवाई करू नये, अन्यथा या सगळ्याच्या विरोधात हॉटेल असोसिएशन देखील कायदेशीर मार्गाचा अवलंब करेल असा थेट इशारा गणेश शेट्टी यांनी दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sucess Story : स्पर्धा परीक्षेत अपयश आले मात्र तो खचला नाही… आता करतोय लाखोंची कमाई

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

राज्यात अनेक जल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस ; नागरिकांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Posted by - September 8, 2022 0
मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना…
Accident News

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Posted by - May 24, 2024 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरहून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक (Accident News) दिल्याने भीषण…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! दिवाळीची साफ-सफाई तरुणाच्या जीवावर बेतली

Posted by - November 2, 2023 0
जळगाव : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. यादरम्यान जळगावमधून (Jalgaon News)…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत सर्वोच्च न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा – अजित पवार

Posted by - July 10, 2022 0
पुणे: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे निवडणूक ओबीसी आरक्षणा विना होणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाला याचा फटका बसला आहे.…
Accident News

Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात

Posted by - August 28, 2023 0
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *