KKR vs SRH

KKR vs SRH : …तर एकही बॉल न खेळता KKR ला मिळणार आयपीएलची ट्रॉफी

619 0

चेन्नई : वृत्तसंस्था – आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (KKR vs SRH) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार यात काहीच शंका नाही.

सामन्यावर पावसाचे संकट
एक्युवेदरने दिलेल्या रिपोर्टनुसार केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यावेळी सायंकाळी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. सायंकाळी तापमान 32 आणि 33 डिग्री सेल्सियस इतकं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि केकेआरचं सराव सत्र रद्द करावं लागलं तसं रविवारी झाल्यास काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून फायनलवेळी पाऊस पडला तरी सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. रविवारी सामना होऊ शकला नाही तर तो सोमवारी खेळवला जाईल.

… तर केकेआरला एकही बॉल न खेळता मिळणार विजेतेपद
राखीव दिवशी देखील पाऊस झाल्यास पाच पाच ओव्हरची मॅच खेळवली जाऊ शकते. जर तेही शक्य नसेल तर एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर देखील खेळवणं शक्य झालं नाही तर केकेआरला एकही बॉल न खेळता विजेते घोषित करण्यात येईल.

कोणत्या बेसिसवर विजेता घोषित होणार
पाऊस आणि अन्य कारणांमुळं आयपीएल फायनल होऊ शकत नसेल तर विजेता तर ठरवावाच लागणार आहे. त्यामुळं आयपीएल मॅनेजमेंट लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या केकेआरला विजेतेपद देऊ शकतात. केकेआरनं त्यांच्या लीग स्टेजमधील 14 मॅचमध्ये 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे 18 आणि दोन मॅचेस रदद् झाल्यानं त्यांचे प्रत्येकी एक एक गुण असे 20 गुण आहेत. तर, दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादकडे 17 गुण आहेत. त्यामुळं पावसामुळं मॅच होऊच शकत नाही, अशी स्थिती झाल्यास केकेआरला विजेतेपद दिलं जाऊ शकतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

KKR vs SRH : IPL Final मध्ये कसे असेल हवामान? कोणत्या संघाचे पारडे राहणार जड?

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

Ben Stokes

Ben Stokes : बेन स्टोक्सने ‘या’ कारणामुळे निवृत्ती घेतली मागे

Posted by - August 16, 2023 0
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने…
T- 20 World Cup

IPL 2024 : ‘हे’ 5 खेळाडू IPL मध्ये करत आहेत जबरदस्त कामगिरी; मात्र तरीदेखील त्यांना मिळणार नाही टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये भारताचे अनकॅप्ड खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. ते आपल्या संघासाठी…
Pollard and Rohit

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Posted by - January 7, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : विजयादशमी निमित्त खोखो खेळाडू संघांनी लुटले सुवर्ण ! खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

Posted by - October 4, 2022 0
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद…
marcus

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसची अविस्मरणीय खेळी! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Posted by - April 24, 2024 0
चेन्नई : केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंटने चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर चेपॉकवर पराभूत केले. चेन्नईकडून मिळालेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *