Accident News

Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर

447 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडाल्याशिवाय (Accident News) राहणार नाही. या व्हिडिओत कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं. उत्तर प्रदेशमधल्या झाशी इथल्या सीपरी बाजार परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
झाशीतल्या अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक टोयोटा फॉर्च्युनर चालक गाडी मागे घेत असताना एका वृद्धाला धडक देतो. या धडकेत वृद्ध जमिनीवर कोसळतो. पण कार चालक त्याच्या अंगावरुन गाडी मागे घेतो. वृद्ध जिवाच्या आंकताने ओरडताना दिसतोय. पण त्या कारचालकाला आपल्या गाडीखाली माणूस चिरडला जातोय याची साधी कल्पनासुद्धा नाही. त्याच परिस्थितीत कार मागे घेत वृद्धाला अक्षरश फरफटत नेताना दिसत आहे.

इतकं होऊनही फॉर्च्युनर चालकाला कोणताही अंदाज आला नाही. काही वेळ कार रिव्हर्स घेतल्यानंतर कसा बसा वृद्ध माणून बाहेर पडतो. तो सावरणार इतक्या पुन्हा कारचालक गाडी पुढे घेतो आणि पुन्हा त्या वृद्धाच्या अंगावरुन गाडी पुढे नेताना दिसतोय. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव राजेंद्र गुप्ता आहे. सुदैवाने रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांनी वृद्धाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनेच्या दिशेने धाव घेतली. जमावाने फॉर्च्युनर कार थांबवत वृद्धाला कारच्या खालून बाहेर काढलं. यात वृद्ध राजेंद्र गुप्ता जबर जखमी झाले. काही लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसंच वृद्ध व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ डिसेंबरपासून ‘रस्ता सुरक्षा उपक्रम’

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर…
Rape

धक्कादायक ! पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर…

अहमदनगर : बीजमाता राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा बाप्पा… पाहा

Posted by - September 1, 2022 0
अहमदनगर : देशभर गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जोशात होत असताना, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या राहत्या घरी अस्सल गावठी…

क्रूरतेचा कळस : पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळले ; परिसरात संतापाची लाट

Posted by - October 4, 2022 0
डोंबिवली : माणसाचा राग दुसऱ्याला कमी आणि स्वतःलाच जास्त उध्वस्त करत असतो. या निष्ठूर बापान संतापाच्या भरात आपलं संपूर्ण कुटुंब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *