Mumbai Crime

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

382 0

मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असताना आता मुंबईमध्येदेखील (Mumbai Crime) अशीच एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. यामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुठे घडली घटना?
मुंबईतील माझगाव परिसरात गुरुवारी (23 मे) एक भीषण अपघात घडला. यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. या दुचाकीच्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 15 वर्षांचा मुलगा माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट ब्रीज मार्गे जे जे रोडच्या दिशेने येत असताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन बाईकची धडक झाली. या घटनेत इरफान नवाब अली शेख (32) नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्या व्यक्तीला तात्काळ भायखळा येथील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी मुंबईतील जे. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जे जे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या अपघातानंतर जे. जे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

धुरळाच…! मुंबईत नुकत्याच विकल्या गेलेल्या या फ्लॅटची किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल; असं काय आहे या फ्लॅटमध्ये, वाचा

Posted by - March 15, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये घरांच्या किमती या कोटिंमध्येच सुरू होतात. पण नुकत्याच विकल्या गेलेल्या या घराची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन…

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…

बुलडाणा की बुलढाणा ? जिल्हा प्रशासनाने केला संभ्रम दूर आता ‘असाच’ उल्लेख करा

Posted by - August 17, 2022 0
बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराच्या नावाचा संभ्रम आता दूर झाला आहे. बुलडाणा नव्हे तर बुलढाणा लिहिणे अनिवार्य असल्याचे…
Ashwini

धक्कादायक! नुकतंच लग्न ठरलेच्या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात…

पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

Posted by - February 10, 2022 0
पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *