Pune News

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

230 0

पुणे : पुण्यात (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाच्या वर एक मनोरुग्ण चढला होता. तो प्रचंड उंचीवर असलेल्या पुलाच्या वर फिरत असल्यामुळे टोल गेल्यास त्याचा अपघात होऊ शकतो किंवा विद्युत तारांमुळे शॉक बसू शकतो, यामुळे लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले.

पुणे स्टेशन भागातील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या रेल्वे प्लॅटफॉर्म कडे जाण्यासाठी जो पादचारी पूल असतो. त्यावर एक मनोरुग्ण चढल्याचं काही प्रवाशांना आढळून आलं. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चार ते पाच अधिकाऱ्यांकडून त्याला खाली घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र मनोरुग्ण कोणाचंच ऐकत नव्हता.

मात्र त्याला खाली उतरवण्यामध्ये लोहमार्ग पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान हा व्यक्ती नेमका कोण आहे? तो वर का चढला होता याबाबत चौकशी केली असता तो टोलवा टोलवीचे उत्तर देत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारे याआधीही एक मनोरुग्ण वर चढला होता, ज्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन सुरक्षारक्षक का नेमत नाही आणि ठोस उपाययोजना का करत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Crime News

Crime News : विकृतीचा कळस ! पुतणीने नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर काकीने दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - August 27, 2023 0
अलिगढ : उत्तर प्रदेशमधील अलिगढ या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये आपले अवैध प्रेमसंबंध…

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…

CRIME NEWS : बनावट कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई..(VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पिंपरी – चिंचवड : नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीचं बनावट कॉल सेंटर तयार करून, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी – चिंचवडच्या…
Unseasonal Rain

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Posted by - January 7, 2024 0
पुणे : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी…

निवडणुका झाल्यानंतर सरकार ओबीसी राजकीय आरक्षणाचा कायदा करणार का ? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Posted by - March 4, 2022 0
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाचा आंतरिम अहवाल फेटाळल्या नंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झाले असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *