Pune Crime Video : मध्यरात्री 2 इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ सुसाट ‘पोर्शे कार’च्या अपघाताचे CCTV फुटेज आले समोर

491 0

पुणे : पुण्यात (Pune Crime Video) कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता. दोघं राजस्थानचे राहणारे होते. हा अपघात झाला तेव्हा ही अपघातग्रस्त कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. सध्या या अपघाताचे CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि आरोपी तरुण हा किती वेगाने गाडी चालवत होता. हा व्हिडिओ समोर आल्याने आरोपी हा दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. संबंधित अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांकडून जामीन देखील मंजूर झाला आहे मात्र या जामीन विरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात जाणार असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून ग्राह्य धरावं अशी मागणी पुणे पोलिसांनी केली आहे.

काय घडले होते नेमके?
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवलं. पोर्शे कारनं धक्का देताच दुचाकीवरील तरुण पुढे असणाऱ्या कारवर आदळला. तर तरुणी हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली. तरुणीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली. तर तरुणाचाही मृत्यू झाला.

दुचाकी रस्त्याच्या एका बाजूने जात असताना मागून आलेल्या कारने त्यांना उडवलं. या अपघातानंतर पोर्शे कारमधील एअर बॅग्ज उघडल्या. त्यानंतर कार बाजूला थांबवण्यात आली. कारमध्ये तिघेजण होते. पीडितांचा मित्र एकीब रमझान मुल्ला याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Lok Sabha Election : ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

Posted by - December 30, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आरोपीने शरीरसुखाची मागणी नाकारल्याने एका महिलेची गळा आवळून…
Pandharpur Accident

Pandharpur Accident : पंढरपुरात पालखी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Posted by - August 26, 2023 0
पंढरपूर : राज्यात अपघाताचे (Pandharpur Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Pandharpur Accident) अनेक घटना समोर येत…
Sangli News

मिरजेत गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने केले ‘हे’ भयानक कृत्य; जिल्हा हादरला

Posted by - June 3, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करुन तिला मिरजेत नेऊन…

पुणे : येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये करण्यात आला ‘हा’ बदल ; वाचा सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी…

Dr. Vijay Bhatkar : महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Posted by - March 22, 2024 0
पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार आज जाहीर झाला आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *