Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

252 0

अहमदनगर : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी नगरमध्ये धनशक्ती सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. नगर येथे बारामती प्रमाणे पैसेवाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी व पक्षाने ट्विटरवर शेअर करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप सत्तेच्या जोरावर पैसे वाटप करून मतदान आणि निवडणूक प्रभावित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे.

ही घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटतानाच व्हिडीओ पुढे आला आहे. या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अहदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकें तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील ट्विटर वरुन हा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाले निलेश लंके?
निलेश लंके म्हणाले, बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतना दिसत आहे. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ही घटना वडझिरे येथे घडली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

Top News Marathi Logo

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा…

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार ; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

Posted by - August 19, 2022 0
मुंबई : आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा…
Parbhani Crime

Parbhani Crime : राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण; मुलाचा मृत्यू

Posted by - August 8, 2023 0
परभणी : परभणीमधील (Parbhani Crime) सेलुतील ब्राह्मणगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये (Parbhani Crime) गावातील महिलेला उपसरपंच पदाचा…

मोठी बातमी ! ‘दुसरा उमेदवारही आमचाच ! आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही !’ संजय राऊत यांची घोषणा

Posted by - May 23, 2022 0
मुंबई- आम्ही कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. राज्यसभेसाठी दुसरा उमेदवारही शिवसेनेचाच असेल अशी घोषणा…
manoj-jarange-patil

Manoj Jarange Patil : धक्कादायक ! जरांगे पाटलांच्या सभेला आलेल्या मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 15, 2023 0
बीड : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *