rishabh pant

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई

743 0

दिल्ली : आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या असून दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी शिक्षा ऋषभ पंतला ठोठवण्यात आल्यामुळे आगामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऋषभ पंत खेळणार नाही आहे.

प्ले ऑफची फेरी गाठण्यासाठी सध्या अनेक संघांमध्ये सामने सुरु आहेत . प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी दिल्लीला आगामी दोन सामन्यात विजय मिळवावा लागणार असून याचदरम्यान ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स साठी मोठा धक्का बसला आहे. दिल्लीसाठी ऋषभ पंत यष्टीरक्षक आणि कर्णधारपदाची भूमिका निभवत आहे. मात्र, याआधी दोनदा पंतवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली होती.

नेमका काय आहे स्लो ओव्हर रेट नियम ?

स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, एकाच हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात येतो. संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंकडून प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Punit Balan : अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवेद्य

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

 

 

 

Share This News

Related Post

Hardik Pandya

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून हार्दिक पांड्या बाहेर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik…

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…
Yusuf Pathan

Yusuf Pathan : युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; TMC कडून उमेदवारी जाहीर

Posted by - March 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (Yusuf Pathan) घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…
Delhi Capitals

दिल्लीच्या संघाला मोठा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी परतला

Posted by - May 6, 2023 0
मुंबई : सध्या आयपीएल एका रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये कोणते संघ जागा मिळवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *