Pune News

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

1622 0

पुणे : जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाही देशात म्हणजे भारतात सध्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांसाठी अनेक राजकीय पक्षांनी जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला आहे. त्यालाच माध्यमांतून प्रसिद्धी मिळते. पण बीबीसी मराठीने याबाबत वेगळा विचार करत एक पाऊल पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खास महिलांनी महिलांसाठी तयार केलेला ‘ती’चा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्गातील महिलांना मांडलेले मुद्दे, उपस्थित केलेले प्रश्न यांच्यावर हा जाहीरनामा आधारित आहे. त्यात समान वेतन, मासिक पाळी रजा, लैंगिक हिंसाचार आणि LGBTQUIA+ समुदायाचे मुद्दे अशा विविधांगी विषयांचा समावेश आहे. या जाहीरनाम्यासाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या पत्रकारांनी महाराष्ट्राभर विविध भागांमध्ये अगदी दुर्गम ठिकाणी जाऊन महिलांचा दृष्टीकोन जाणून घेतला. त्याचाच समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला.

जाहीरनाम्यासाठी करण्यात आलेली पहिली वृत्तमालिका ‘कणखर बायांची गोष्ट’ ही होती. या मालिकेमध्ये दारूबंदी, अपंगत्व, बालविवाह अशा अनेक अडथळ्यांच्या विरोधात धाडसाने आणि लढाऊ बाण्याने संघर्ष करणाऱ्या महिलांचा प्रवास मांडण्यात आला. राजकीय पक्षांनी या निवडणुकीत कशाला प्राधान्य द्यायला हवे, याबाबत समाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या या महिलांनी अगदी परखडपणे त्यांची मते मांडली.

त्यानंतर ‘ती’चा जाहीरनामा ही दुसरी वृत्तमालिका होती. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात बीडी कामगार, शेतकरी, मच्छिमार, टेक्सटाईल कामगार आणि आदिवासी महिलांचा समावेश होता. या निवडणुकीतून त्यांना असलेल्या अपेक्षा या सगळ्यांनी मांडल्या. महाराष्ट्रातील बीड, गोंदिया, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांतील या महिलांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेबाबत त्यांची मते व्यक्त केली.

या दोन मालिकांमध्ये अनेक महिलांनी त्यांच्या दृष्टीने असलेल्या प्राधान्य क्रमाबाबत मते व्यक्त केली. त्या सर्वांचे संकलन करून बीबीसी न्यूज मराठीने हा जाहीरनामा तयार केला. या महिलांच्या मते राजकीय पक्षांनी प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज आहे.

त्या माध्यमातून किमान वेतन कायदेशीर करणे, घरकाम करणारे, कचरा वेचणारे आणि अशा इतर अनेक क्षेत्रातील महिलांना सामाजिक संरक्षण मिळवून देणे, त्याचबरोबर परवडणारी घरे मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करणे याबरोबरच अनेक मुद्द्यांवर काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

जाहीरनाम्याबाबत अधिक तपशील :
https://www.bbc.com/marathi/articles/cmm3yn5y6npo

बीबीसी न्यूज मराठीने 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर पुण्यात या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी या जाहीनाम्याच्या माध्यमातून मांडलेल्या विविध प्रश्नांवर, समस्यांवर आणि मुद्द्यावंर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामांकित महिला, पत्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्ययांनी सहभाग घेतला. बीबीसी मराठीने केलेल्या या दोनही वृत्तमालिका BBC News Marathi च्या वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत.

https://www.bbc.com/marathi

https://www.youtube.com/c/BBCNewsMarathi

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

काय आहे केंद्राची अग्निपथ योजना ? या योजनेला होणारा विरोध योग्य आहे का ?

Posted by - June 16, 2022 0
नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलासाठी अग्निपथ योजना अमलात आणण्याचे ठरवले आहे. मात्र त्यापूर्वीच या योजनेला तीव्र विरोध होताना दिसून…

Special Report : वादाच्या भोवऱ्यात सापडणारी नृत्यांगना गौतमी पाटीलची कहाणी ! कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास

Posted by - January 11, 2023 0
अनेक लावणी कलाकार तिच्यावर नाराज आहेत. लावणीच्या परंपरेला गालबोट लावण्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. अशी कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.…

#Travel Diary : मानसी गंगा कुंड या पवित्र सरोवराचा संबंध श्रीकृष्ण-राधाराणीशी आहे, स्नान केल्याने मिळते प्रत्येक पापातुन मुक्ती

Posted by - March 9, 2023 0
आपल्या देशात गंगेला नदी नव्हे तर गंगा मैया म्हणतात आणि तिचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. पूजा-विधीच्या आधी जागा पवित्र…
LokSabha

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Posted by - April 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *