Kolhapur Crime

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

414 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Crime) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या केली आहे. कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात ही घटना घडली आहे. सादिक मुजावर असे आरोपी मुलाचं नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
सादिक हा आपल्या पत्नीसोबत फोनवर बोलत होता. मात्र त्याची आई मध्येच बोलल्यानं त्याला राग आला, याच रागाच्या भरात त्याने आपल्या आईची हत्या केली. कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात कौटुंबिक वादातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सादिकने आपल्या आईच्या छातीवर, पोटावर, पाठीवर सुऱ्यानं वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली.

बायकोसोबत बोलत असताना आईमध्येच बोलल्याचा राग आल्यानं आरोपीने आपल्या आईची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Related Post

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : वारणा नदीच्या पुलावरून बस कोसळून कोल्हापुरात भीषण अपघात

Posted by - November 9, 2023 0
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही…

Maharashtra Political crisis : ‘त्या’ आमदारांच्या भवितव्यावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी – सुप्रीम कोर्ट

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एकंदरीत घडणाऱ्या राजकीय वादळावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने 29 जुलै पर्यंत…

जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 10, 2022 0
पुणे- जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी बांधव आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *