1 may

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

2592 0

मुंबई : नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम (Rules Change From 1st May 2024) बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. उद्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 1 मे पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहेत तर ते बदल नेमके कोणते आहेत जाणून घेऊया…

1) सिलेंडरचे दर
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदलल्या जातात. कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर रिव्हाइज केले जातात. त्याचबरोबर, कंपन्यांकडून पीएनजी, सीएनजी आणि एटीएफच्या किंमतीमध्ये देखील बदल केले जातात.

2) HDFC बँक
HDFC बँकेकडून खासकरुन जेष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेली स्पेशल एफडी (FD)मध्ये गुंतवणूक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ही स्कीम मे 2020मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गंत जेष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते.

3) ICICI बँक
ICICI बँकेकडून सेव्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन चार्ज 1 मेपासून लागू होणार आहेत. बँकेकडून सांगण्यात आले आहे की, डेबिट कार्डची फी एका वर्षासाठी 200 रुपये करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागात ही फी 99 रुपये असेल. 1 मेपासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे झाल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत. आयएमपीएसमधून ट्रान्सेक्शनवर 2.50 ते 15 रुपयांपर्यंतचे ट्रान्सेक्शन चार्ज लागणार आहे.

4) यस बँक सेव्हिंग अकाउंट
यस बँकने देखील 1 मे 2024 पासून सेव्हिंग अकाउंटच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी व्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या मिनिमम अॅव्हरेज बँलेन्सच्या शुल्कात बदल केले आहेत. प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, कमाल शुल्क 1,000 रुपये असेल. याशिवाय, सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, Yes Essence SA आणि YES Respect SA मधील किमान शिल्लक 25,000 रुपये असेल. या खात्यावर 750 रुपये शुल्क आकारले जाईल. यस बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट प्रो मध्ये 10,000 मिनिमम बँलेन्स ठेवायला लागणार आहे. यावर 750 रुपयांपर्यंतचे अधिक शुल्क लागणार आहे. सेव्हिंग व्हॅल्यूसाठी 5000 रुपयांची लिमिट आहे आणि 500 रुपयेपर्यंतचा अधिक चार्ज लागणार आहे. त्याचबरोबर माय फर्स्ट अकाउंटसाठी 2500 रुपयांची लिमिट आणि मॅक्सिमम चार्ज 250 रुपये असणार आहे.

5) IDFC फर्स्ट बँक
IDFC फर्स्ट बँकेकडून नवीन नियम बनवण्यात आला आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डने वीजेचे बील, गॅस किंवा इंटरनेटचे बिल भरत असाल आणि एक महिन्याची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क 1 टक्के होणार आहे. ज्यावर 18 टक्के जीएसटीदेखील लागेल. मात्र जर तुम्ही FIRST Private Credit Card, LIC Classic Credit Card किंवा LIC Select Credit Card चा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे…
UPI Payment

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Posted by - January 29, 2024 0
सध्याच्या काळात यूपीआय ट्रांझेक्शनच्या प्रमाणात (Cashback) मोठी वाढ झाली आहे. आजच्या काळात खिशात कोणी कॅश ठेवत नाही. 10 रुपये जरी…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…
ITR

ITR : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2022- 23 या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरण्याची डेडलाइन आली जवळ; अन्यथा बसेल दंड

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2022-23 या आर्थिक वर्षाचे आयकर विवरण दाखल (ITR) करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. आयकर खात्याकडून…

अर्थकारण :पीएफमधून पैसे काढताय? हि माहिती अवश्य वाचा,अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान…

Posted by - July 8, 2022 0
केंद्र सरकारने सध्या ईपीएफ किंवा पीएफवरून पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अशा स्थितीत काही जण कोणताही विचार न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *