Nashik Accident

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

3637 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चांदवडमधील राहुड घाटामध्ये एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

कसा झाला अपघात?
मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या या एसटी बसचा टायर अचानक फुटला. राहुड घाट परिसरामध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडील टायर फुटला आणि बस एका बाजूला झुकली. प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. टायर फुटल्याने बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले किंवा बसल्या खिडक्यांवर आदळले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3 ते 4 प्रवासी दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. हा अपघात नेमका कसा घडला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले..

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज जोरदार उत्तर दिलं आहे.’एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य…

रावणाचा जीव बेंबीत तर काहींचा मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Posted by - March 25, 2022 0
मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक…
Jalgaon Crime

पत्नी, मुलगा घराबाहेर पडताच बापाने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - May 18, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद (Nasirabad) येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन…

‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 10, 2022 0
मुंबई : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *