Loksabha

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

438 0

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावले. यवतमाळ- वाशिममधील संजय देशमुख हे काँग्रेस, अपक्ष, भाजप आणि आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदेसेनेच्या राजश्री पाटील एकत्रित शिवसेनेकडून नांदेड दक्षिणमध्ये विधानसभा निवडणूक लढल्या होत्या.

बुलढाणा मतदारसंघातील प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर हे जुने शिवसैनिक दोन वेगवेगळ्या गटांकडून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हातकणंगलेत शिंदेसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजीत पाटील असा मुकाबला आहे. सत्यजीत हे एकदा शिवसेनेचे तर एकदा काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक लोकसभेच्या रिंगणात आमने सामने आल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात कोणत्या लोकसभा मतदारसंघात शिवसैनिक लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने आले आहेत जाणून घेऊयात…

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ
संदिपान भुमरे( शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत खैरे ( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

कल्याण मतदारसंघ
श्रीकांत शिंदे( शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर-राणे (उद्धव ठाकरेंची शिवसेना)

हातकणंगले मतदारसंघ
धैर्यशील माने( शिवसेना) विरुद्ध सत्यजित पाटील ( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ
नारायण राणे ( भाजपा) विरुद्ध विनायक राऊत ( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ
राहुल शेवाळे ( शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (उद्धव ठाकरेंची शिवसेना)

शिर्डी मतदारसंघ
सदाशिव लोखंडे ( शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे ( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

यवतमाळ – वाशिम मतदारसंघ
राजश्री पाटील( शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उद्धव ठाकरेंची शिवसेना)

हिंगोली मतदारसंघ
बाबुराव कदम कोहळीकर ( शिवसेना) विरुद्ध नागेश आष्टीकर (उद्धव ठाकरेंची शिवसेना)

शिरूर मतदारसंघ
डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट)

बुलढाणा मतदारसंघ
प्रतापराव जाधव( शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर ( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

पालघर मतदारसंघ
राजेंद्र गावित (भाजपा) विरुद्ध भारती कामडी (उद्धव ठाकरेंची शिवसेना)

मावळ मतदारसंघ
श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे पाटील( उद्धव ठाकरेंची शिवसेना)

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांमध्येच लोकसभेसाठी सामना रंगतोय. यामध्ये कोण बाजी मारून खासदार होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

पुणेकर थंडीने गारठले, राज्यात सर्वात कमी तापमान पुण्याचे, वाचा सविस्तर

Posted by - November 1, 2022 0
पुणे : दिवाळीनंतर पावसानं उसंत घेतली पण पुणेकरांची स्थिती सध्या आगीतून फुफाट्यात झाल्यासारखे आहे पावसानं यावर्षी पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर जोडपून…

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीव्र नाराजी, म्हणाले…

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराच्या मुद्द्यावरून बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 18, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा तरुणालाच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - October 31, 2023 0
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक…
Ajit Pawar

Ajit Pawar : पुणे पॉर्शे अपघातानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाले कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी..

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दोघांना चिरडल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची देशात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *