Vishal Patil

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

482 0

सांगली : महाविकास आघाडीत सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेवरून मोठा पेच निर्माण झाला होता. या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी दावा ठोकला होता. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंकडे गेली. मात्र काँग्रेस या जागेबाबत आग्रही होती. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणाहून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्यासाठी आज अखेरचा दिवस होता मात्र तरीदेखील विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने सांगलीत मविआला मोठा धक्का बसला आहे.

मविआमध्ये सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात आल्यानं जिल्हा काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी शिष्टाई केली. मात्र त्यात यश आले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण विशाल पाटील यांची समजूत काढू असं म्हटलं होतं. अखेर विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं. अपक्ष विशाल पाटील यांना थोड्याच वेळात निवडणूक चिन्ह मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्याच वेळात चिन्हांचे वाटप होणार आहे.

तिरंगी लढत होणार
सांगली लोकसभेसाठी मविआकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून या जागेसाठी संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसेच आता विशाल पाटीलदेखील निवडणूक लढवणार असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…

दहावी बारावीचे निकाल जुनमध्येच लागणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती

Posted by - April 21, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच जूनमध्ये लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे…
Shinde Group MLA Fight

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Posted by - March 1, 2024 0
मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने संपवले जीवन

Posted by - November 14, 2023 0
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात…
jagdish Mulik

‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 10, 2023 0
पुणे : दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Director Sudipto Sen) यांचा ‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story) हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *