Pune News

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

195 0

पुणे : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मोठ्या थाटात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील ज्ञानवंत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील ‘आंबेडकराईट स्टुडंटस कोलंबिया’चे प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे, कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

नुकतेच 3 डिसेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 14 एप्रिल 2024 रोजी अमेरिकेत 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले हे विशेष ! या पुस्तकामुळे मी पुन्हा वाचनाकडे वळलो, असे अनेक तरुण वाचक आवर्जून सांगत आहेत. अगदी कमी कालावधीत या पुस्तकाने विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे.

पुस्तकावर लोक जे प्रेम करत आहेत, ते पुस्तकातील आशय आणि त्यातून त्यांना पटलेले जागतिक प्रेरणादायी बाबासाहेब, यामुळे लोक इतका भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला, नव्या भाषेत मोटिव्हेशनल आणि सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. वाचकांना तो आवडला आहे. सर्वांचे आभार! लवकरच या पुस्तकाच्या इंग्रजी व हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करू.
जगदीश ओहोळ, लेखक

कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’ च्या माध्यमातून भीमजयंती सह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक व सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे.
विकास ताताड, ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’ प्रमुख व कोलंबिया विद्यापीठ सिनेट, अमेरिका

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! पुण्यातील बावधनमध्ये कोयत्याने वार करून महिलेची निर्घृणपणे हत्या

Posted by - March 6, 2024 0
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Pune Crime News) बावधन या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिक महिलेची तिच्या…
Pune University

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Posted by - December 11, 2023 0
पुणे : महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. (Pune University) लोकसेवेचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया उभारण्याचे महत्त्वाचे…
Parbhani News

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह; परिसरात उडाली खळबळ 

Posted by - March 16, 2024 0
Pune: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या…
Kavita Dwivedi

Baramati News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण: निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Posted by - May 4, 2024 0
बारामती : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्यादृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी…

Breaking News ! दाढी कटिंग महागली ! सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ

Posted by - April 20, 2022 0
पुणे- सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी आपल्या सेवेमध्ये दरवाढ केली आहे. व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *