LokSabha

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

380 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात या जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शन, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिकत्व संहिता कायद्यांना प्राधान्य दिले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात ओएनओपी, लखपती दीदी, पीएम सूर्य घर योजना, रामायण यात्रा, इन्फ्रा वर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण, पेपर लीक कायदा लागू करणार, नवी शिक्षण धोरण, 2036 मध्ये ऑलिम्पिक यजमानपद, 3 कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी संकल्प पत्रात देण्यात आलीय.

1 गरीब कुटुंबांची सेवा, 2 मध्यम वर्गातील कुटुंबाचा विश्वास, 3 नारी शक्तिचे सशक्तिककरण, 4 तरुणांना संधी, 5 वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य, 6 शेतकऱ्यांचा सन्मान, 7 मत्स्यपालन कुटुंबांची समृद्धी, 8 मजूरांचा सन्मान, 9 एमएसएमई, लहान व्यापारी आणि बांधकाम मजूरांचे सशक्तिकरण, 10 सबका साथ, सबका विकास 11 विश्वबंधु भारत, 12 सुरक्षित भारत, 13 समृद्ध भारत, 14 ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब करणार भारत, 15 जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर, 16 ईज ऑफ लिविंग, 17 वारसा आणि विकास, 18 सुव्यवस्था, 19 निरोगी भारत, 20 गुणवत्तापूर्ण शिक्षण, 21 खेळाचा विकास, 22 सर्व क्षेत्रात समग्र विकास, 23 तंत्रज्ञान आणि नवकल्पना, 24 पर्यावरण अनुकूल भारत याबाबत मोदींची गॅरंटी या संकल्पपत्रात देण्ययात आल्या आहेत.

Share This News

Related Post

पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास…

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Posted by - March 11, 2022 0
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी  मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता…

मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

Posted by - September 18, 2022 0
नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला…
Ritesh Deshmukh

Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण

Posted by - February 18, 2024 0
लातूर : लातूरमधील निवळी या ठिकाणी विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब (Ritesh Deshmukh) यांच्या पुर्णाकृती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *