Sanjay Mandlik

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

332 0

कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे शाहू महाराज यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं ते म्हणाले आहेत. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडीने कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता व्यक्त होत होती. पण भाजपाने संजय मंडलिक यांना मैदानात उतरवलं आहे. यानंतर भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अशाच प्रचारसभेदरम्यान संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

काय म्हणाले संजय मंडलिक?
“आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला,” असं संजय मंडलिक म्हणाले आहेत. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशी विचारणा संजय मंडलिक यांनी यावेळी केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

“सत्ता असो किंवा नसो,मतदार संघासाठी निधी कमी पडणार नाही”…! धनंजय मुंडे यांची ग्वाही

Posted by - July 15, 2022 0
परळी : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी मध्ये त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री आणि…
ED

पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन ईडीकडून जप्त

Posted by - May 21, 2022 0
मुंबई- ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने कारवाई करत पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली…

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा ; विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Posted by - July 26, 2022 0
मुंबई : लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री…

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल…

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

Posted by - October 30, 2022 0
तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *