Ramdas and Pooja tadas

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

283 0

वर्धा : वर्धा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत सासरे (Ramdas Tadas) विरुद्ध सुनबाईंची लढत रंगण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या विरोधात पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मात्र आता पुजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केले आहेत.

खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हा अर्ज अद्याप परत मागे न घेतल्याने पुजा पंकज तडस यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानले जात आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या पूजा तडस ?
पूजा तडस यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेमध्ये पूजा तडस यांनी तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.’ मी लोकांपर्यंत माझं म्हणणं पोहोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुटुंबानं आपला छळ केला, मारहाण केली. माझ्या मुलाच्या डीएनए चाचणीचीही मागणी केली असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी तडस कुटुंबींयावर केला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी भाजप नेते करतात मग माझ्यावर का अन्याय केला? असा सवाल पूजा तडस यांनी केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार…
Ramdas Athawale

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Posted by - April 8, 2024 0
मुंबई : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची…

’50 खोके घेऊन चोर आले…’ रॅपर राज मुंगासे मीडियासमोर, म्हणाला…

Posted by - April 12, 2023 0
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. हे रॅपसॉंग तयार करणारा रॅपर राज मुंगासे…

वेदांता-फॉक्सकॉनसंदर्भात फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ! अतुल लोंढे

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे…
Narayan Rane

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Posted by - April 18, 2024 0
मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *