Maharashtra Politics

Maharashtra Politics : सांगली शिवसेनेच्याचं पारड्यात, स्थानिक काँग्रेस नाराज; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरीचेबल

438 0

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेली सांगली लोकसभेची जागा शिवसेनेचे पारड्यात पडली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली. मात्र यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते प्रचंड नाराज झाल्याचे दिसून येत आहे. तसेच काँग्रेसचे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे नॉट रिचेबल झालेत.

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि सांगली लोकसभेसाठी आधीपासून इच्छुक असलेले विशाल पाटील यांच्याशी कसलाही संपर्क झालेला नाही. विश्वजीत कदम हे भाजपबरोबर जाण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहेत. त्यातच आता लोकसभेची जागा न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी आणखी वाढली आहे. त्यामुळे कदाचित ते कोणाशी संपर्क करत नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे कार्यालयाबाहेर देखील शिक्षकांत पाहायला मिळाला याचाच अर्थ विशाल पाटील यांचे अर्थात काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत.

काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांना सांगितले उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह करण्यात आला. मात्र तसेच आले नाही. त्यामुळे हक्काचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसेच विश्वजीत कदम हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार हे ते दोघेही संपर्कात आल्यानंतरच कळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Maharashtra Premier League 2024 : KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात

अखेर महाविकास आघाडीतील सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा सुटला; पहा कोणता पक्ष लढणार कोणती जागा?

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

Downward Dog Pose : अधोमुख श्वानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

नाराजी बाजूला सारून जगदीश मुळीक यांनी घेतली मुरलीधर मोहोळांची गळाभेट

Posted by - March 16, 2024 0
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. या जागेवर नवा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - March 19, 2022 0
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Posted by - November 10, 2023 0
पुणे : ‘वाढदिवस साजरा करताना लोकोपयोगी उपक्रम राबवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपण समाजासाठी जीवन वाहून दिलेले असते. त्यामुळे…

निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले; पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - December 3, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून निलेश माझेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून…

‘मॅजिक फिगर’वर कोण होणार स्वार ? पुण्यात सुरू ‘पॉलिटिकल वॉर’ !

Posted by - February 5, 2022 0
स्वबळावर लढू; ‘मॅजिक फिगर’ गाठू, महापौर बसवू : राष्ट्रवादी राष्ट्रवादीला रोखा नाहीतर आपल्याला धोका : काँग्रेस-शिवसेना —————————– पुणे महापालिकेतील महाविकास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *